Late Prof. R. T. Ranade

प्रा. रा. त्र्यं रानडे हे सिव्हील डिपार्टमेंटमधील एक ज्येष्ठ व आदर्श प्राध्यापक होते. आपल्या विषयाच्या सविस्तर नोट्स ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत व प्रत्येक लेक्चरनंतर त्यात अधिक माहिती नोंदवून ठेवीत. बहुरंगी करमणूक या त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या तीन पुस्तकांमुळे त्यांचे नाव घराघरात पोचले होते. त्यासाठी होस्टेलच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अॉक्सिडेशन पॉंड बांधून डॉ. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम. ई. केले. दुर्दैवाने १९७२ मध्ये ब्रेन हॅमरेजने त्यांचे अकाली निधन झाले.