वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर

वालचंद कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी  नवनिर्मिती आणि उद्योग व्यवस्थापनात आपला वेगळा ठसा उमटविला असून विविध क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान मिळविले आहे.  कॉलेजमधील प्राध्यापकांची वॆशिष्ठ्यपूर्ण शिक्षणपद्धती,  मार्गदर्शन व प्रयत्न यास कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही’

वालचंद कॉलेजच्या या यशस्वी प्रवासाचा मागोवा घेऊन तसेच वालचंदचे निवॄत्त प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून तंत्रवॆज्ञानिक संशोधन व स्वयंउद्योगास प्रेरक असे केंद्र सुरू करण्याचे ज्ञानदीप फॊंडेशनने ठरविले आहे.  कारण  ज्ञानदीप इन्फोटेक तसेच ज्ञानदीप फॊंडेशन या दोन्ही संस्थांची निर्मिती वालचंदच्या ज्ञानवटवॄक्षाच्या छायेतच झाली आहे. नवनिर्मिती व स्वयंउद्योगात.

प्रदीर्घ अनुभव व आस्था असणारे वालचंदचे प्रा. भालबा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ’वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर’ या नावाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. शालेय स्तरावर मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या सांगलीतील 'मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेने या उपक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले आहे.

या प्रकल्पाचे उद्‍घाटन वालचंदचे माजी विद्याथी, उद्योजक आणि सांगलीचे राजेसाहेब श्री. विजयसिंहराजे पटवर्धन यांचे शुभहस्ते माजी प्राध्यापक स्नेहमेळाव्यात दिनांक २९ जून २०१८ रोजी करण्याचे योजिले आहे.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण परंपरा फार उज्वल, प्रेरणादायी आणि नवनिर्मिती व स्वयंउद्योजगतेस चालना देणारी  अशी १९७० ते २००० या सुमारे प्रदीर्घ अशा तीन - चार दशकांतील आहे. या  काळात बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील नवशोधन, उद्योग उभारणी, सरकारी वा खाजगी उपक्रमात आपला वेगळा ठसा निर्माण केला.

या प्रदीर्घ काळातील शिक्षणाची उज्वल परंपरा आपल्या उपक्रमशील, परिवर्तनवादी, प्रागतिक आणि अभ्यासू वृत्तीमधून अध्यापनाचा उच्च दर्जा निर्माण करून शिक्षक-विद्यार्थी आणि संस्था-उद्योगक्षेत्रातील परस्परसंबंधांचा (interactive) आदर्श निर्माण केला.

अशा शिक्षण परंपरेच्या कार्यपद्धतीचे व Teaching चे एक प्रारूप विकसित करणे आवश्यक वाटते. आजच्या घसरत्या दर्जाच्या ( शिक्षण व संशोधनातील) काळात केवळ कँपस सिलेक्शनचा आकडा गाठण्यातील लघुदॄष्टीमुळे उद्योग व स्वतंत्र व्यवसायामध्ये कर्तॄत्व दाखविणार्‍या विद्यार्थ्यांची परंपरा खंडित झाली आहे. अशा काळात वालचंदच्या शिक्षणाचा दर्जा निर्माण करणार्‍या शिक्षकांच्या कार्यपद्धतीचे मार्गदर्शक मॉडेल अन्य कॉलेज शिक्षकांना मार्गदर्शक व्हावे यासाठी उपलब्ध करणे गरजेचे वाटते. इंजिनिअरिंग शिक्षण पद्धति व व्यवस्थापनातून उत्तम विद्यार्थी आणि संशोधनाची परंपरा घडविणारा सुवर्णकाळ वालचंदमध्ये प्रदीर्घ काळ राहिला.

अशा परंपरेचे पाईक राहिलेले अनेक निवॄत्त अध्यापक दरमहा एकत्र येण्याचा उपक्रम गेली २५ वर्षे सातत्याने करीत आहेत. या उपक्रमातून व जुन्या स्मॄती जागवून त्यातून अन्य संस्थांतील प्राध्यापकवर्गाला मार्गदर्शक व्हावे असे Model प्रारूप उपलब्ध करून देण्याचे दॄष्टीने Entrepreneurs of WCE Past Students व Innovations of Walchand Past Students प्रकाशात आणून १९७०-२००० या काळातील अध्यापनाचे व संशोधनकार्याचे मर्म उलगडणारे अनुभव भांडार उघड करणे आवश्यक वाटते.