Late Prof. R. R. Tilwalli


Photo of Late Prof. R. R. Tilwalli (Central in standing row)with his parents

Prof. R. R. Tilwalli expired on January 4, 2019.

His brother Sridhar Tilwalli's meesage
He did yoga, played tennis, worked on Bullwokker, never visited Hotel in Sangli, drank water through Nostrils. But fate struck him with Parkinson 15 years back. An intellectual giant in Sanskrit, English,Kannada, Marathi, philosophy and myriads of subjects. A music maestro. His students remember him as an inspiring teacher. An entertaining conversationist with versatile and spellbinding capability. We have lost a Saint as well as Mr Google of the family with a human touch and unmatched humility.. Last year he had a parting hug and I could feel his wet eyes. Life is all about fond and profound memories that linger on forever.

प्रा. तिलवल्ली सरांच्या दु:खद निधनानें आपणा सर्वांमधून एक उमदे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड लोप पावले आहे.माझ्या करियर ची सुरुवात सरांच्या मार्गदर्शनानेच झाली व ग्रंथालयाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या वैयक्तिक शैक्षणिक विकासात सरांचा मोलाचा वाटा आहे. मी जेंव्हा जेंव्हा त्याना भेटायला जायचो तेव्हा ते आपुलकीने, कौतुक व प्रोत्साहीत करायचे. मी त्यांचे हे प्रेम कधीच विसरु शकत नाही.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. - डॉ. व मिसेस एस ए एन इनामदार

S.S.Bapat
It is shocking to learn about the sad demise of Prof. Tilwalli. He was my teacher and I was also associated with him in Arts Circle of WCE. His knowledge of Hindustani and Karnatic classical music was immensely deep. He had a good collection of old recordings of stalwarts in music.
Dr. P. A. Kulkarni - Sad news. Me and my sons were close to Tilwallis for many many years thru Tennis and intellectual discussions. His illness took away many pleasures of companionship May his soul rest in peace.

Prof. Walwadkar
Every body of us dishearten with sad demise of Prof Rghu Tilwalli.For the last two years I came in close contact with Tilwalli family. l used to meet him frequently.He was suffering for the last ten years unrecoverable Parkinson disease .He was a real teacher.He was keeping busy with various kinds of books.He was interested in classical music.His good command over English was an added qualification.When I organised a workshop on applicable Mathematics in 1998 ,he helped me lot in drafting latteers in English language.Invisible force behind him was his wife what we call her Ramakaku.She served Prof Tillwalli a lot for which we have no words.She is ideal Indian wife . I feel myself lucky that I have come in contact with this ideal couple and was present to the last rite of late Prof Tilwalli.With this little words I pay my tribute to Prof Tilawalli.

रघूकाका : “हरहुन्नरी” या शब्दाची व्याख्याच बदलणारे व्यक्तिमत्व. -Rajeev Lokare, Pune.
रघूकाकांना जाऊन आज एक आठवडा उलटला.
त्यांच्या बद्दल काहीतरी लिहून मन मोकळं करावं असं वाटलं आणि लक्षात आलं की रघूकाकांची व्यक्तीरेखा रेखाटणं अतिशय कठीण आहे.
कदाचीत पु.ल. त्यांना भेटले असते तर त्यांनी “गणगोत” मध्ये रावसाहेबाच्या पंक्तीत रघूकाकांना नक्कीच बसवलं असतं. पण मला त्यांना शब्दाच्या चिमटीत पकडणं अशक्य आहे,म्हणुन फ़क्त त्यांच्या आठवणी पकडण्याचा हा एक अपुरा पण प्रामाणिक प्रयत्न.
रघूकाकांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. ते कशात पारंगत होते असं कुणी विचारलं तर अभिजात शास्त्रीय संगीत( हिंदुस्तानी as well as कर्नाटकी ), English literature, Economics, Industrial Management अशी अनेक विषयांची यादी करावी लागेल. या प्रत्येक विषयाबद्दल रघूकाकांविषयी भरभरून बोलणारे त्यांचे अनेक विद्यार्थी मिळतील.
पण माझ्या मनाला भावणारा त्यांचा स्वभाव विशेष, his amazing USP was “his approach towards human beings." मग ती छोटी मुलं असोत, students असोत, colleagues असोत अथवा Seniors असोत.
माझी रघूकाकांची पहिली आठवण त्यांच्या सायकलच्या दांडीवर बसुन मारलेल्या फ़ेरीची आहे. तेंव्हा पासून शेवट पर्यंत मी त्यांच्यासाठी सायकलच्या दांडीवरचा राजूच राहिलो आणि ते इतरांसाठी Professor Tillwali असले तरी माझ्यासाठी ते शेवट पर्यंत रघूकाकाच राहीले..
आम्ही शहांच्या बंगल्यात रहात असताना (मी पहिली दुसरीत असेन) या प्रेमळ रुणानुबंधाची सुरवात झाली. आणि कॉलेज क्वार्टरसमध्ये शिफ्ट झाल्यावर तिलवल्ली काकांच्या घराची समोरची खोली मग आमचं Chess चं battle field बनलं. मला बुध्दिबळाची आवड लावण्याचं सारं श्रेय रघूकाकांना जातं. दररोज डावांच्या फ़ेरी झडु लागल्या .. आणि हळु हळु मी त्यांना कधी हरवु लागलो ते समजलं नाही. शाळेतल्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत हारल्यावर जणू रघूकाकांचीच हार झाली असं वाटून मी रडलो होतो. त्या वेळी त्यांनी मला जवळ घेऊन समजूत काढली होती.आयुष्यात सगळेच डाव जिंकता येत नाहीत. पराभवाचा सामना पण करता यायला हवा हे त्यावेळी नकळत उमजलं असावं.
दुर्देवानं मी या खेळाला फार seriously घेतलं नाही आणि आपला देश एका Grand Master ला मुकला !! Jokes apart, रमाकाकुंच्या अजुनही लक्षात आहे की त्यांचे लग्नाच्या नव्या नवलाईचे दिवस या बुध्दिबळाने कसे disturb झाले.
मोठे तिलवल्ली retire झाल्यानंतर रघुकाका विश्रामबाग मधल्या त्यांच्या बंगल्यात रहायला गेले. तिथं मग सुरु झाला माझा गजल्सचा प्रवास.
मी आणि रघूकाकांनी त्यांच्या त्यावेळच्या modern audio system वर मेहेंदी हसनचं “ये धुंवा कहांसे उठता है” आणि “कैसे छुपॉंऊ राज हम” अगणित वेळा अैकलं असेल. किंबहुना ही गाणी ऎकल्या शिवाय मी कधीच त्या घरातुन बाहेर आलो नाही.
बुध्दीबळा सारख गाणंही मी Lightly च घेतलं पण “गाणं कस ऎकावं, बारकावे कसे समजुन घ्यावेत” याचे धडे मात्र मला इथंच मिळाले. एखाद्या गाण्यातल्या छोट्याश्याच पण अप्रतिम जागेला हेरायची आणि दाद द्यायची सवय मला फ़क्त रघूकाकांमुळेच लागली.
बेंगलोरला असताना रघूकाका आमच्याकडे राहायला आले . कारमध्ये मी त्यांना आशा - गुलाम अलीचा latest Album ऎकवला. त्यांनी याची copy दे असं सांगितल्यावर मी पटकन Cassette च काढुन दिली. तेंव्हा मला त्यांच्या माझ्यावर त्यांनी केलेल्या संस्कारांची छोटीशी परतफ़ेड केल्याचं समाधान लाभलं.

"चहा" हे दारुपेक्षाही निंदनीय पेय आहे अशी त्यांची पक्की समजुत असावी. मी, दादा आणि आईने खुप प्रयत्न केले त्यांना चहा पाजायचे... पण पठ्ठ्या काही बधला नाही. दादांचं लोकांना आग्रह करायचं कसब आयुष्यात फक्त इथं हतबल होताना मी पाहिलं.
दोन सेमिस्टरमध्ये Management subjects शिकवताना त्यांनी Typical Syllabus मध्ये Prescribe केलेली पुस्तकं कधीच refer केली नाहीत. प्रत्येक Topic मध्ये best possible input देण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असे. हे करताना त्यांचं प्रचंड वाचन आणि गाढा अभ्यास नक्कीच कामी येत असणार.
शेवटच्या वर्षात आम्हा बॅचमेटस् ना (विशेषतः सांगलीकर )interview देणं आणि group discussion करणं हे अगदीच नवखं होतं. अशा वेळी रघूकाकांचं मार्गदर्शन खुपच मोलाचं ठरलं. कधी कधी मला वाटायचं की हा माणुस वालचंदमध्ये काय करतोय? त्यांची प्रतिभा याहिपेक्षा मोठ्या आव्हानांना लीलया पेलणारी होती.
त्याची विनोद सांगायची Style पण फ़ारच अफ़लातुन होती. साधे साधे चुटकुले त्यांच्या तोंडुन एकताना सुध्दा खुप मजा यायची.
रघूकाका मुळातच Perfectionist होते. गाण्यातल्या सुरांपासुन ईंग्रजी च्या स्पेलिंग आणि व्याकरणातल्या चुकांपर्यंत चुकीच्या गोष्टी त्यांना लगेच खटकायच्या. पण त्या बरोबरच त्या चुका शांतपणे समजाउन सांगण्याचे कसब पण त्यांना आत्मसात होतं.
Perfectionist असणं हा शाप आहे की वरदान हा चर्चेचा विषय आहे. परवा रमाकाकुंना भेटायला गेल्यावर त्यांनी बोलता बोलता हा विषय काढला. “कोणीहि लग्नपत्रीका घेउन आल्यावर त्यातल्या व्याकरणातल्या चुका काढुन काय मिळतं तुम्हाला?” असं त्या त्यांना नेहमी विचारायच्या
पण ते काही बधायचे नाहीत. “चुका झाल्या असतील तर त्यांना मी नाही सांगितल्या तर कोण सांगणार ?”असा त्यांचा युक्तिवाद असायचा. Of course , रघूकाकांच प्रेमच येवढा मोठा Plus Point होता की लोकही अशा गोष्टी समजुन घ्यायचे.
रघूकाकांच्या विषयी असलेल्या आठवणी आर्ट सर्कलचा उल्लेख केल्या शिवाय संपूच शकत नाहीत. दहावी आणि आकरावी एकत्र होऊन आलेल्या आमच्या बॅच मध्ये टॅलेंट खच्चून भरलेलं होतं. या टॅलेंटला वाव मिळण्यासाठी एका सशक्त प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. आर्ट सर्कलच्या स्थापनेने हा सशक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. रघूकाकांना सर्वाथाने या संस्थेचा पाया मानावा लागेल. आर्ट सर्कलच्या सुरवातीच्या प्रवासात रघूकाका खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. परिणामस्वरूप आर्ट सर्कलने पुढील अनेक वर्षे गाजवली, वाखाणण्यासारखे कार्यक्रम केले.
रघूकाकांना स्वत:ला Physically Fit ठेवलं होतं. Bull Worker वरचा व्यायाम आणि Regular Tennis court वर खेळायला जाणं त्यांनी जमेपर्यंत सोडल नाही.
पोट सुटायचं बाजुला राहु द्या,पण इतक्या वर्षात त्यांच्या शरीरयष्टीत कधीच फ़रक जाणवला नव्हता.
मला वाटतं हे सगळं नियतीला पाहवलं नाही आणि पार्किन्सन नं त्यांना गाठलं.
गेली १० -१५ वर्ष त्यालाही त्यांनी झुंज दिली. त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना नीट बोलता येत नव्हतं.
ज्या माणसाला बोलायला खुप आवडतं, त्या माणसाठी ही अवस्ठा अत्यंत क्लेशकारक होती.
पण तरीही त्यांच्या चेहेऱ्यावरचं हसु शेवटपर्यंत तसंच होतं.
त्यांच श्रेय त्यांच्या पेक्षाजास्त रमाकाकुंना जातं. अश्या व्यक्तिमत्वाचं शिवधनुष्य पेलणारी सहचारिणी रमाकाकुंच्या रुपात त्यांना लाभली.
गेली पंधरावर्ष त्यांचा आजार आनंदानं जीवनाचाच एक हिस्सा मानुन त्यांनी सहजपणे स्वीकारला. त्यामुळं घरातलंआनंदी वातावरण टिकुन राहिलं.
रघूकाका गेले हे समजलं आणि ऑफिस साठी तयार असलेली गाडी मी सांगलीकडे वळवली.त्यांना शेवटचं पहाणं माझ्या नशिबी नव्हतं पण रमाकाकुंना भेटुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यावर मनावरच मळभ थोडस निवळलं
परत जातना आशाचं “दिल धडकने का सबब याद आया.. वो तेरी याद थी अब याद आया” लावलं आणि ऎकता ऎकता मनाचा इतकावेळ थोपावुन ठेवलेला बांध फ़ुटला..
[5:31 AM, 1/14/2019] +91 94203 59059: Post by Rajeev Lokare, Pune.