प्रा. कॅप्टन लक्ष्मण (श्याम) गोविंद गोळे

प्रा. कॅप्टन लक्ष्मण (श्याम) गोविंद गोळे.
मोबाईल +91 9869359976.

जन्म औंध संस्थानची राजधानी औंध येथे आजोळी पंत पटवर्धन येथे 16-10-1938. वडील कै.श्री. गोविंद लक्ष्मण गोळे मोजणी खात्यांत फिरतीवर असायचे. म्हणून आत्याबाई कै.सौ. कमलाबाई पटवर्धन मला सांगली येथे घेऊन गेल्या. माझे जवळ जवळ सर्व शिक्षण तेथेच झाले. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगली येथून 1961 मध्ये बी.ई. सिव्हिल झालो. सेंट्रल पी.डब्लू.डी.(नाशिक रोड),एम.ई.एस.(मुंबई) येथे नोकरी करून 24-11-1962 ते 24-11-1965, कॅप्टन (AEE) म्हणून बॉर्डर रोड्स (ग्रेफ) मध्ये जम्मू-काश्मीर, लडाख व भूतान येथे सीमांलगत रस्ते बांधणीवर प्रतिकूल हवामानांत, बर्फांत काम केले. आठवणींची नोंद वेगळी केलेली आहे. नंतर सोलापूर येथे पॉलिटेक्निक येथे नोकरी केली. वालचंद इंजिअरिंग कॉलेज सांगली येथे 01-11-1968 ते 31-10-1998 अशी 30 वर्षे नोकरी करून असि. प्रोफेसर म्हणून निव्रूत्त झालो. या कालावधीत डिप्लोमा तिन्ही वर्षे, डिग्री चारी वर्षे व एम.ई. या सर्व वर्गांवर शिकविण्यास मिळाले. अप्प्लाईड मेक., स्ट्रक्चरल मेक.,डिझाईन व सर्वच विषय झाले. त्याशिवाय बांधकाम विभाग प्रमुख, रेक्टर म्हणून काम पाहिले., एफ.ई. प्रवेश (15 वर्षे) शिवाजी विद्यापीठ (8 वर्षे) रिझल्ट करणे यांचे संगणीकरण काम केले.हे काम तर मला फारच आवडले. निव्रूत्तीनंतर सांगली येथे व वाशी (नवी मुंबई) येथे वास्तव्य आहे.

सध्या गोळे कुल वॄत्तांताचे संगणीकरण करणेचे काम करीत आहे.

पत्नी सौ. सरोज एम.ए. असून कन्या महाविद्यालय, सांगली येथून प्राध्यापिका म्हणून 2005 साली निव्रूत्त झाल्या आहेत. मुलगी सौ. स्मिता सतीश धारप एम.डी. असून मुंबई येथे प्रक्टीस करतात. मुलगा श्री. मिलिंद लक्ष्मण गोळे बी.ई.(इले.) असून वाशी येथे राहतात. ते टाटा पॉवर कंपनीमध्ये सिनिअर मॅनेजर म्हणून मंबई येथे काम करतात. सौ. संगीता मिलिंद गोळे ह्या बी.ई.(कंप्युटर) आहेत व वाशी येथेच सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम पहातात. मुलगा हेमांग तिसरीमध्ये शिकत आहेत.


पुस्तक लेखन :

    • एफ.ई. साठीं अप्लाईड मेक.वरचे पुस्तक प्रसिद्ध आहे. एफ.ई.साठीं सिव्हिल इंजिनिअरिंग वर पुस्तक लिहिले असून शिवाजी विद्यापीठ व अन्य विद्यापीठांनीं टेक्स्ट बुक म्हणून लावले आहे.1974 पासून हें पुस्तक चालू आहे. सध्या महालक्ष्मी पब्लिशिंग हाऊस कोल्हापूर यांचेतर्फें हे पुस्तक प्रकाशित होतें. 2013 मध्यें सहावी आवृत्ती येत आहे.
    • छंद/आवड
    • कंप्युटर व नेटवर कामें करणे.
    • पुस्तकें वाचणे.
    • 1975 पासून ब्रिज खेळतो आहे.
    • सामन्यांमध्ये बरेच वेळा बक्षिसें मिळविली आहेत.

आदर्श :

  • हरीभाऊ पटवर्धन (आत्याचे यजमान), वालचंद कॉलेजचे पहिले प्राचार्य गोखले, पुढील एक प्राचार्य कानिटकर, सचिन तेंडुलकर, इत्यादि.