Prof. Bhalba (B.D.) Kelkar
प्रा. भालचंद्र दामोदर केळकर
बी.ई.(इले.) एम. ई.(मेक.) डिझाईन
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यासय, सांगली, निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग (१९६१-१९९२)
ए.आर.ई. एज्युकेशन इक्विपमेंट प्रा. लि., मिरज (१९९२ - २०००) येथे व्यवस्थापकीय संचालक
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे १९६१-१९९२ या काळात तीस वर्षे यंत्र अभियांत्रिकी विषयातील नामवंत प्राध्यापक म्हणून निवृत्त.
अध्यापन काळात शिवाजी विद्यापीठ - सिनेट सदस्य. अभियांत्रिकी अभ्यासकिरमांच्या विकासात उल्लेखनीय सहभाग. अध्यापनाबरोबरच प्रयुक्त संशोधनामध्ये व अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षण विकासात मोलाचा सहभाग.
अध्यापनकाळात इंजिनिअरिंग शिक्षणाला दिशा देणा-या, प्रायोगिक शिक्षणास उपयुक्त, विविध अभियांत्रिकीच्या विद्याशाखांना उपयुक्त अशा प्रयोग संचांचा संशोधनपूर्ण अभ्यासातून विकास व निर्मितीमध्ये स्वदेशी लॅबोरेटरी इक्विपमेंटची निर्मिती अेआरई (अप्लाईड रिसर्च अँड इंजिनिअरिंग) च्या माध्यमातून देशभर प्रसार व परदेशी निर्यात कार्यात यशस्वी.
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या स्वयंचलित गुणवत्ता तपासणी यंत्राची संरचना व निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य केले. (ARE Test Systems & ARE Education Equipment Pvt. Ltd.)
अनेक पुरस्कार - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे चे पारके अॅवार्ड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबई चे आंत्रेप्रुनर अॅवार्ड, स्कूल ऑफ अप्लाईड रिसर्च चे वतीने उत्कृष्ठ बैलगाडी डिझाईनसाठी (WIPO - World Intellectual property Organization, Geneva) यांचे सुवर्णपदक व एन. आर.डी.सी. डिझाईन अॅवार्ड इ. पारितोषिके मिळविली. अभियांत्रिकी विषयातील तंत्रशास्त्रज्ञ म्हणून ख्याती.
खेळातून विज्ञान - "Learn while you play" या वैज्ञानिक खेळण्यांच्या विकासातून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान-विकास प्रकल्पातून शिक्षण देणारे उपक्रम मिहणून विद्यार्थीप्रिय लेखनमाला व पुस्तके प्रसिद्ध.
"अठराव्या शतकातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान" पुस्तक, भारतीय सिक्षण मंडळासाठी, धर्मपाल यांचे साहित्य खंडातील दहावे पुस्तक श्री. बा. वा. भागवत यांचेबरोबर सहलेखक म्हणून प्रसिद्ध केले.
"Theory of Machines" या विषयावर "यंत्रशास्त्र" हे मराठी पाठ्यपुस्तक अभियांत्रिकीच्या शिक्षणक्रमासाठी प्रसिद्ध केले. (महाराष्ट्र विद्यापीठ - मराठी ग्रंथ निर्मिती मंडळ, यांनी) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा उत्कृष्ठ लेखन पुरस्कार.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या "DIPEX" या अभियांत्रिकी डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्याशोधकतेला प्रोत्साहन देणारा (Project) प्रकल्प विकास प्रदर्शन या उपक्रमाचे निर्मितीमध्ये मोलाचा सहभाग.
शोधकता व नवशोधन, विज्ञान आणि अध्यात्म या विषयांचे व्यासंगी अभ्यासक व लेखक. सांगली येथील नवसोधता केंद्राचे (Centre for Innovation) संचालक.
"Student Diary", "Dreams and challenges" (An experiment in Entrepreneurship & Product Development) " शोध शोधकतेचा, ध्यास इनोव्हेशनचा" ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर.