रेक्टर बर्वे सर
वर्षभरातील सर्व एफएस व बिलमन्सच्या नेमणुका लॉटने पण वर्षाच्या सुरुवातीस केल्या जात. यासाठी असलेली मिटिंग चुकवणे कोणाही विद्यार्थ्यास महाग पडे. कारण अनुपस्थित विद्यार्थ्यांची नेमणूक अग्रहक्काने परीक्षेच्या दिवसात व्हावयाची. शिवाय, या मिटिंगला उशिरा (म्हणजे सरांनी घेतलेल्या रोल कॉलनंतर) येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित समजले जाई. प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला सर्व क्लब्जची मिळून एकत्र अशी ग्रॅण्ड गार्डन पार्टी असे. त्यासाठी लागणारे फर्निचर अर्थात विद्यार्थ्यांच्या रूममधील टेबल, खुर्च्या २६ जानेवारीस सकाळी ६ वाजता ठेवण्याची सूचना असे. पण बरेचजण कदाचित सकाळी जाग उशिरा आली तर सरांकडून बोलणे खायला लागू नये म्हणून आदल्या रात्रीच बाहेर काढून ठेवायचे. शिवाय २६ जानेवारीच्या पार्टीस येणाऱ्या सांगलीच्या राजघराण्यातील कोणी मातब्बर असामी वा कलेक्टरसारख्या प्रमुख पाहुण्याने वेळेवर येणे अपेक्षित असायचे.
कारण काही झाले तरी पार्टी बरोबर रात्री ८ ला सुरू होई. या गार्डन पार्टीचे स्थळ म्हणजे मेस व निवासी इमारतीमधल्या भागात सरांनी वसविलेली सुंदर बाग. त्यामधील कच्च्या रस्त्यावरून शॉर्टकटने भाजीचा टांगा न्यायचा नाही, हे भाजीवाल्यास बजावलेले असे. एकदा एक भाजीचा टांगा तेथून गेला असता सरांनी त्या भाजीवाल्यास सांगितले की हा टांगा परत गावात पाठव व दुसऱ्या टांग्यातून भाजी आण. त्यामुळे पुन्हा कधी अशी चूक करण्याची प्राज्ञा नसे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्लबच्या आचाऱ्यांना ५० ताटे पेले,१०० वाट्या-चमचे वगैरे मोजून दरवर्षी ताब्यात दिलेले असे. त्यावर हॉस्टेलचा शिक्का असे. त्यामुळे एखादी वाटी चोरणेही तिघांपैकी कोणास परवडणार नाही असा त्या वाटीच्या तिप्पट आकाराइतका दंड प्रत्येकास होत असे. त्यामुळे एकही चमचा कधी हरवला नाही असे तेथील स्टॉफ सार्थ अभिमानाने सांगायचा.
खरे तर वरपांगी शिस्तखोर दिसणारे आमचे बर्वे सर मनातून खूप मायाळू होते. त्याचे वानगीदाखल उदा. म्हणजे एकदा एक विद्यार्थी टॉयफाईडने आजारी झाला व त्याच्या घरी कळवूनही त्याच्या पालकांना येण्यास काही काळ लागला. अशा वेळी दरम्यानच्या काळात सरांनी त्यास आपल्या घरी नेऊन ठेवले व बर्वे कुटुंबाने त्याची काळजी वाहिली होती.
आमच्या कॉलेजच्या वेळा खूप कालावधीच्या-सकाळी ७.४५ ते संध्याकाळी ५.००-असल्याने पूर्वीच्या रेक्टरांकडे विद्यार्थी तक्रार करीत की, सर, आमची रूम बऱ्याच दिवसांत झाडलेली नाही. पण बर्वेसर आल्यानंतर त्यांनी केलेल्या व्यवस्थेनुसारज् यामध्ये रूम झाडल्यावर विद्यार्थ्यांची सही घेण्याची पद्धत होती त्यामुळे न झाडलेल्या दर १०० रूममागे अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाऊ नये म्हणून हा झाडूवालाच आमच्या रूम्स झाडण्यासाठी मागे लागायचा. कोणतीही समस्या असो, सरांकडे त्यावर लगेच उपाय असे. पाणीटंचाईच्या दिवसात सकाळी ११ नंतर बाथरूमला कुलपे लागायची; पण बेसीन व संडासचे पाणी चालू असे, अर्थात याविषयी पूर्वसूचना असायचीच. दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ज्येष्ठतेनुसार रूम निवडता येई. त्या वेळीच त्यास १ बुक रॅक व १ टेबल लॅम्प दिला जाई. हा टेबल लॅम्प प्रत्येक विद्यार्थ्यास टेस्ट करून चालत असल्याचे दाखवून दिला जाई व वर्षाच्या शेवटी परत घेताना तो टेस्ट केला जाई. जर तो त्या वेळी चालला नाही तर रु. ७चा दंड लागे व तेव्हा तिथे त्याची अगदी किरकोळ दुरुस्ती करण्याची मुभा नसे. कोणत्याही विद्यार्थ्यास बोलावयाचे झाले तर सरांचा गडी विठ्ठल एक कुलूप घेऊन येत असे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या बंद रूमवर सरांचे आणखी एक टाळे लागल्याने तो विद्यार्थी कोणतीही सबब सांगण्याची मुभा न राहिल्याने लगेच येऊन भेटायचाच. अशा सर्व नियमांची अंमलबजावणी चोख व्हायचीच. याचे इंगित म्हणजे सर कधीही कोणावर काट न खाता, एखाद्याचा बरा-वाईट असा कोणताही पूर्वानुभव लक्षात न घेता कारवाई करायचे,जे आपणा सर्वांना एक वेळ श्न्य होईल; पण कोणावरही, कसलाही फेवर न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट ते कटाक्षाने पाळत. त्यामुळेच त्यांच्याकडून शिक्षा झालेल्या कोणालाही त्यांच्याबद्दल राग नसे, तर आदरच वाटे. अशी व्यक्ती मी उभ्या आयुष्यात नंतर पाहिली नाही, वा आपणही कुणी पाहिली नसेल.
अनुकूल-प्रतिकूल संवेदनांचा परिणाम आपल्या मनावर न घडवणे यापेक्षा वेगळे आध्यात्मिक लक्षण ते कोणते?
Author - Biodata of Shri. Mahajan in his own words...Name - Shrikant Yashavant Mahajan 1974 Electrical batch of WCE
I witnessed WCE's Silver Jubilee Function 1972, whenas a student then, I had won competition for Ad collection for Suveniour. My collection was some 3 times Souvenoir's entire budget, mainly because of the WCE's very high reputation as our college stood as deepstambh to industries in & around Sangli-Miraj belt, mainly in the areas of testing & consultancy. I had tried every sector -sugar factories,even shopkeepers/restarunts, gas agencies,wine shops either helped by WCE or patronized by Walchandians, nobody disappointed me. So, Physics HOD Prof Mahadane i/c gave me 3 times prize amount of Rs 100. As I was hard up could not meet my expenses within Rs 60 I used to get fom my home, I suggested Prof Brahmanalkar to keep our library open beyond 5 pm by volunterring to work initially from 6 pm to 10 pm for the compensation of Rs 2 i.e. Rs 52 pm(that time Krishna Khore's cream milk used to cost 85 paise foe 500 ml)per day(& then through out night during exam days), so that no book was being taken away by any student at home/room for his own selfish reading, depriving others to access it (those days some books were not available in shops in Mumbai too).
- << Prev
- Next