वालचंद हेरिटेज
माजी विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी वाटणारी आत्मियता ही शिक्षक आणि सहकारी मित्रपरिवार यातूनच वृद्धिंगत झालेली असते. कॉलेज शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यावर हा मित्रपरिवार विखुरला जातो. नोकरी वा व्यवसायातील यशासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक असते. माजी विद्यार्थ्यांच्या या गरजेकडे लक्ष दिले जात नाही. निवृत्त शिक्षकही विद्यार्थ्यांपासून दुरावले गेल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा माजी विद्यार्थ्यांना मिळणे दुरापास्त होते.
वालचंदच्या माजी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने याच उद्देशाने संकेतस्थळ कार्यरत ठेवण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. आर्थिक नुकसान सोसून संस्थेने हा धाडसी पण हितकारक निर्णय घेतला याबद्दल संस्थेच्या विश्वस्तांचे अभिनंदन.
ज्ञानदीप फौंडेशनच्या वालचंद हेरिटेज प्रकल्पामध्ये माजी विद्यार्य़ी, माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची जमा केलेली माहिती, वालचंद कॉलेजच्या प्रगतीचा इतिहास तसेच भावी योजना यांची माहिती या संकेतस्थळावर राहणार आहे. वालचंद माजी विद्यार्थी संघटनेचा वा वालचंद कॉलेजच्या अधिकृत माजी विद्यार्थी वेबसाईटचा या संकेतस्थळाशी कोणताही संबंध नाही. या संकेतस्थळासाठी कोणतेही प्रवेश मूल्य वा सदस्यता वर्गणी नाही. या संकेतस्थळावर माजी विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसाय वा उद्योगाच्या जाहिराती सशुल्क प्रसिद्ध करता येतील. मात्र कोणतेही कारण न देता जाहिरात वा मजकूर प्रसिद्ध करणे वा न करणे हा अधिकार ज्ञानदीप फौंडेशन स्वतःकडे सुरक्षित ठेवीत आहे.
संकेतस्थळावरील कोणत्याही मजकुराविषयी कोणाचीही तक्रार आल्यास ती माहिती काढून टाकण्यात येईल.